दिब्रिटो यांची निवड हा मराठी वैचारिक विश्वातील काळा दिवस ! – आनंद दवे, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ
भाषा आणि संस्कृती यांचा जवळचा संबंध असतो. ख्रिस्तीकरणात अग्रेसर असणारे फ्रान्सिस दिब्रिटो मराठी भाषा आणि संस्कृती यांचे काय कल्याण साधणार ? त्यामुळे दिब्रिटो यांच्या निवडीला होत असलेला विरोध हा रास्तच आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने या विरोधाची नोंद घेऊन संमेलनाच्या अध्यक्षपदी सरस्वतीच्या उपासकाची निवड करावी !
पुणे : धाराशिव येथे होणार्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ख्रिस्ती धर्मोपदेशक फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाली आहे. या निवडीला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे श्री. आनंद दवे यांनी विरोध दर्शवला असून ‘मराठी वैचारिक विश्वातील काळा दिवस’, अशा शब्दांत त्यांनी या निवडीवर टीका केली आहे. ‘फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मप्रचार करतात. हिंदुत्वाला शिव्या देण्यात ते कायम अग्रस्थानी असतात. त्यांनी कधी ख्रिस्ती धर्मछळ, अंधश्रद्धा यांवर टीका केली आहे काय ? मनुवाद, गोडसेवाद, फॅसिझम म्हणत ख्रिस्ती धर्म आणि अंधश्रद्धा यांचा ते प्रसार करतात. धर्मांतर हेच दिब्रिटो यांचे जीवनध्येय आहे’, अशी टीकाही श्री. आनंद दवे यांनी केली.
अनेकांनी दिब्रिटो यांच्या निवडीला आक्षेप घेतला असून सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारेही ‘मराठी साहित्य परिषद आणि दिब्रिटो यांची निवड करणार्या अन्य संस्था यांचा निषेध नोंदवा’, असे संदेश प्रसारित होत आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात