Menu Close

हिंदु जनजागृती समितीकडून स्वामी सुंदर गिरी महाराज यांची भेट

मला तुमच्या कार्यात सहभागी होण्यास आवडेल ! – स्वामी सुंदर गिरी महाराज

स्वामी सुंदर गिरी महाराज (डावीकडे) यांना हिंदु जनजागृती समितीविषयी माहिती देतांना श्री. शंभू गवारे

कोलकाता (बंगाल) : हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत समन्वयक श्री. शंभू गवारे यांनी कोलकाता येथे जुना आखाड्याचे महंत स्वामी सुंदर गिरी महाराज यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी श्री. गवारे यांनी स्वामीजींना समितीच्या राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या कार्याची माहिती दिली. समितीचे कार्य ऐकून स्वामीजींना अतिशय आनंद झाला. ‘मला तुमच्या कार्यात सहभागी होण्यास आवडेल’, असे गौरवोद्गार स्वामीजींनी या वेळी काढले.

स्वामी सुंदर गिरी महाराज यांचा परिचय

स्वामीजी जुना आखाड्याचे महंत तथा ‘खुनी नागा साधू’ आहेत. (उज्जैनमध्ये नागा बनलेल्या साधूंना ‘खुनी नागा साधू’ संबोधले जाते.) स्वामीजी हिंदु मिशन, बंगालचे अध्यक्ष; अखिल भारतीय हिंदु महासभा, बंगालचे प्रदेशाध्यक्ष; राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बंगालचे संतप्रमुख तथा प्रांत आणि संस्कृती प्रमुख आहेत. विश्‍व हिंदु परिषदेच्या दक्षिण बंग सेवा वर्गप्रमुखाचे दायित्वही स्वामीजींकडे आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *