मंदिर सराकारीकरणाचे दुष्परिणाम
शिर्डी : साई संस्थानच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या व सध्या अफरातफरीप्रकरणी निलंबित झालेल्या दोन कार्डिओलॉजिस्ट डॉक्टरांविरोधात मंगळावरी संस्थान प्रशासनाने शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही डॉक्टरांना अपहारप्रकरणी ७ नोव्हेंबर २०१४ रोजी निलंबित केले होते.
साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदयरोगावर उपचार करण्यासाठी डॉ. हरीश बजाज व डॉ. गौरव वर्मा यांची नेमणूक झाली होती. अँजिओप्लास्टी करताना रुग्णावर स्टेन्ट वापरल्या जातात. त्याची ऑर्डर संस्थानतर्फे दिली जाते. मात्र विशिष्ट कंपनीचीच स्टेन्ट खरेदी करण्यासाठी शिफारस केली. यामुळे २०११ पासून ते २०१४ या काळात याचे विशेष लेखा परीक्षण केल्यानंतर प्राप्त अहवालानुसार ३ कोटी ९५ लाख ९३ हजार ३९१ रुपये इतके नुकसान डॉ. बजाज व वर्मा यांच्या कार्यकाळात झाले. यामध्ये दोन्ही डॉक्टरांनी आर्थिक अपहार केला आहे, या तक्रारीवरून त्यांना ७ नोव्हेंबर २०१४ रोजी साई संस्थानने निलंबित केले होते. तेव्हापासून ते संस्थानच्या सेवेत नाहीत; मात्र, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी कोपरगावचे माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी औरंगाबाद खंडपीठात एक जनहित याचिका दाखल केली होती.
साई संस्थाने या प्रकरणी चौकशी करण्याठी निवृत्ती न्यायाधीशांची नेमणूक केली. त्यांनी चौकशी केली असून निष्कर्ष येणे अद्याप बाकी आहे. या प्रकरणाचे विशेष लेखा परीक्षण साई संस्थानने करून घेतले. त्याच्या अहवालानुसार संस्थानचे ३ कोटी ९५ लाख ९३ हजार ३९१ रुपयांचे नुकसान केल्याचे स्पष्ट झाले. वैद्यकीय संचालक डॉ. विजय पाटील यांनी तक्रार दाखल केली.
संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स
Your views are welcome
SABKA MANGAL HO
Jai shri ram
“अक्षरधाम” मंदिर दुनिया में कहीं भी हो बहुत ही अद्भुत आधुनिक संरचना हैं! यदि आपने अभी तक कोई भी अक्षरधाम मंदिर नहीं देखा, तो आप जीवन में कुछ खो रहे हैं!
वहां का शाकाहारी भोजन भी ला-जवाब है!
तुम धर्म की रक्षा करों धर्म तुम्हारी रक्षा करेगा