लोकसंख्येच्या नियंत्रणासाठी देशभरात समान नागरी कायदा लागू करा !
यवतमाळ : ज्याप्रमाणे मोदी सरकारने घटनेचे कलम ३७० हटवून ‘एक देश एक संविधान’ हे तत्त्व अमलात आणले, त्याच प्रमाणे समता, न्याय, बंधुता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी ‘एक देश एक विधान’ लागू करणे अत्यावश्यक आहे, त्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेऊन देशात तात्काळ समान नागरी कायदा लागू करावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २३ सप्टेंबरला स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून केंद्रशासनाला पाठवण्यात आले. या वेळी अपर जिल्हाधिकारी ललित कुमार वराडे यांनी निवेदन स्वीकारले.
नवी देहली येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला काळे फासणार्यांवर देशद्रोहाचा, तसेच राष्ट्रप्रेमींच्या भावना दुखावण्याचा गुन्हा नोंद करावा; श्री जगन्नाथ मंदिर, पुरी येथील प्राचीन मठ तोडण्यात आले, ते ओडिशा सरकारने पुन्हा उभारून द्यावे, तसेच आंध्रप्रदेशसह देशभरातील सरकारीकरण केलेली मंदिरे भक्तांच्या स्वाधीन करावीत, या मागण्यांचेही निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे सर्वश्री मंगेश खांदेल, प्राध्यापक अनंत अट्रावलकर, शिवाजी नवगण, सौ. कल्पना राऊत उपस्थित होत्या.