नवरात्रोत्सवाच्या वेळी मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकारकडून नियमावली सादर
हिंदूंच्या सणांच्या वेळी नियम बनवणारे काँग्रेस सरकार मोहरम किंवा ईद या सणांच्या वेळी नियमावली बनवतात का ?
नवी देहली : मध्यप्रदेश सरकारकडून नवरात्रोत्सवाच्या वेळी दुर्गादेवीच्या मूर्तीची उंची ६ फुटांपेक्षा उंच असू नये, तसेच रात्री १० ते सकाळी १० या कालावधीत ध्वनीक्षेपकाचा वापर करू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाला भोपाळ येथील भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि हिंदु संघटना यांनी विरोध केला आहे.
१. खासदार साध्वी प्रज्ञासिंह म्हणाल्या की, सरकारचा हा आदेश आम्हाला मान्य नाही. जर हा आदेश आमच्यावर लादण्यात आला, तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू. आम्ही ध्वनीक्षेपक, डीजे का लावू नये ? हिंदू त्यांचे उत्सव त्यांच्या इच्छेप्रमाणे का साजरे करू शकत नाही ? न्यायालयाने कोणती नियमावली दिलेली नाही, तरीही हिंदूंच्या सणांच्या वेळी असे नियम लावले जातात.
२. हिंदु संघटनांनी सरकारला दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, हिंदूंच्या पूजेमध्ये अशा प्रकारची आडकाठी आणणे कोणालाही मान्य होणार नाही. शास्त्रामध्ये जे नियम आहेत त्यानुसार आम्ही आचरण करतो. जेव्हा हिंदूंचे सण येतात, तेव्हा नियम लागू केले जातात. हे काँग्रेसचे नियम आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात