यवतमाळ : नवरात्रोत्सवानिमित्त होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक अनिल सिंह गौतम यांना २३ सप्टेंबरला निवेदन देण्यात आले. या वेळी ते म्हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समिती करत असलेले कार्य उत्तम आहे. अशी राष्ट्र आणि धर्म भक्ती प्रत्येकामध्ये निर्माण व्हायला हवी.’’ या वेळी त्यांना उत्सवकाळात चालू असलेल्या समितीच्या प्रबोधनकार्याची माहिती देण्यात आली. निवेदन देतांना हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यवतमाळ : नवरात्रोत्सवानिमित्त होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी अपर पोलीस अधीक्षकांना निवेदन
Tags : Hindu Janajagruti Samiti