‘काश्मीरमधील मुसलमानांचा नरसंहार होत आहे’, असे मुसलमानांविषयी नक्राश्रू ढाळणार्या पाकचे अमेरिकेनेच कान टोचले हे बरे झाले ! भारतातील मुसलमान आणि पाकप्रेमी याविषयी का बोलत नाहीत ?
न्यूयॉर्क : ‘चीनमध्येे मुसलमानांची स्थिती अत्यंत वाईट आहे. त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे; मात्र त्यावर पाकिस्तान कोणतीही चिंता व्यक्त करत नाही. पाकने त्यावर चिंता व्यक्त केली पाहिजे; कारण तेथे मानवाधिकाराचे अधिक उल्लंघन होत असून तेथील मुसलमानांना धार्मिक स्वातंत्र्यही देण्यात येत नाही’, अशा शब्दांत अमेरिकेच्या दक्षिण आणि मध्य आशिया येथील प्रकरणांच्या मंत्री एलिस वेल्स यांनी संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये पाकला सुनावले. ‘आम्ही भविष्यातही हेे सूत्र परत परत मांडत राहू’, असेही वेल्स यांनी स्पष्ट केले.
चीनच्या शिनजियांग प्रांतातील उघूर वंशीय मुसलमानांना चीनकडून स्वतंत्र तळावर ठेवण्यात आले आहे. अनुमाने १० लाखांहून अधिक मुसलमानांना तेथे नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर चिनी संस्कृतीचे संस्कार करण्यात येत असून त्यांना मुसलमान धर्माच्या कोणत्याही कृती करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याविषयी जगातील एकही इस्लामी देश चीनच्या विरोधात बोलण्यास धजावत नाही. त्यात पाकचाही समावेश आहे. पाकची अर्थव्यवस्था चीनच्या आधारावर असल्याने तो यावर मौन बाळगून आहे, तर अन्य इस्लामी देशांचे चीनशी व्यापारी संबंध आहेत आणि ते त्याला दुखावू इच्छित नाहीत. (ही आहे इस्लामी देशांची वस्तूस्थिती ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात