चेन्नई : ‘भारत विकास परिषदे’च्या वतीने येथील ‘जेजीव्हीव्ही’ उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये नुकतेच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये संबोधित करण्यासाठी परिषदेने हिंदु जनजागृती समितीला आमंत्रित केले होतेे. समितीच्या वतीने पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी ‘आनंदप्राप्तीसाठी स्वभावदोष निर्मूलनाची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी जिज्ञासूंच्या प्रश्नांना उत्तरेही देण्यात आली. या व्याख्यानाच्या आयोजनासाठी भारत विकास परिषदेचे अध्यक्ष श्री. नरेंद्रन् यांनी पुढाकार घेतला. ‘भारत विकास परिषद आणि हिंदु जनजागृती समिती यांची तत्त्वप्रणाली एकच आहे’, असे श्री. नरेंद्रन् यांनी बोलतांना सांगितले. तसेच ‘यापुढे दोन्ही संघटना एकत्रित काम करतील’, असेही ते म्हणाले. ‘वन्दे मातरम्’ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
क्षणचित्रे
१. या वेळी पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांना ‘हिस्ट्री ऑफ द सायन्टिफिक डेव्हलपमेंट ऑफ इंडिया – अॅन इन्ट्रडक्शन’ हे पुस्तक भेट देण्यात आले.
२. या कार्यक्रमात सनातनचे तमिळ ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.