मुंबई : येथील नवजीवन विद्यामंदिर माजी विद्यार्थी संघ, भांडुप विचार मंच (व्हॉट्सअॅप ग्रुप) यांच्या संयुक्त विद्यमाने टेंबीपाडा येथे नुकतेच ‘शैक्षणिक साहित्य वाटप सोहळा २०१९’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उपस्थित विद्यार्थी, पालक यांना पितृपक्षाविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात १०२ होतकरू विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप, शिष्यवृत्ती वितरण, आदर्श खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. सर्वश्री गणपत खांडेकर, तुकाराम पाष्टे, महेंद्र कदम, शेखर जागडे, धर्मप्रेमी अधिवक्ता संतोष महामुनी या आयोजकांसह समाजसेवक श्री. दत्ताराम निकम, श्री. अनिल कदम यांची या ठिकाणी प्रमुख उपस्थिती होती.
वैशिष्ट्यपूर्ण
कार्यक्रमाच्या दिवशी या ठिकाणी केक कापून श्री. रमेश डोंगरकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार होता; मात्र समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रबोधनामुळे धर्मशास्त्रानुसार वाढदिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी होतकरू विद्यार्थ्यांना सनातनचे ‘रामरक्षास्तोत्र’, ‘श्री सरस्वतीदेवी’ आदी लघुग्रंथ देण्यात आले. या वेळी ‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य पुष्कळ चांगले आहे. आपल्याला यांचे मार्गदर्शन घेऊन कार्य करता येईल’, असे मत समाजसेवक श्री. दत्ताराम निकम यांनी व्यक्त केले.