‘काश्मीरसाठी कोणीही बंदूक घेऊन आला, तरी तो परत जिवंत जाणार नाही’, हे भारताने आधीच स्पष्ट केलेले आहे, हे इम्रान खान यांनी लक्षात ठेवावे !
न्यूयॉर्क – काश्मीरमधील स्थिती पाहून जगातील १३० कोटी मुसलमानांपैकी एखादा मुसलमान हातात बंदूक हाती घेईल. मी विचार करतो की, मी काश्मीरमध्ये असतो आणि ५५ दिवसांपासून मला बंद केलेे असते, तर मीही बंदूक हाती घेतली असती, असे विधान पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी २७ सप्टेंबरला संयुक्त राष्ट्राच्या महासभेत केले.
(म्हणे) ‘हिंदु धर्मावर आरोप होत नाहीत !’
‘इस्लामोफोबिया’मुळे जग विभागले जात आहे. हिजाब एक शस्त्र ठरत आहे. ९/११ पासून हे प्रारंभ झाले. ‘स्वर्गात यांना अप्सरा मिळतात; म्हणून हा समाज आत्मघाती आक्रमणे करतो’, असे लोकांना सांगण्यात आले. हिंदु धर्मावर मात्र आरोप होत नाही. (हिंदूंमध्ये असे काहीच सांगण्यात येत नाही आणि हिंदू सहिष्णु आहेत, हे जगजाहीर आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) मुसलमान नेतृत्वामुळेच मुसलमानांचे हे अधःपतन झाले आहे, असे इम्रान खान म्हणाले. (असे आहे, तर इम्रान खान अशा मुसलमान नेत्यांवर कारवाई का करत नाहीत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
अणुयुद्ध टाळण्यासाठी संयुक्त राष्ट्राने दायित्व बजावावे !
तुम्ही काश्मीरमधील लोकांवर बंधने घालून त्यांना कट्टर बनवत आहात. मी पुन्हा सांगू इच्छितो की, वेळ कठीण आहे. संयुक्त राष्ट्राचेही दायित्व आहे की, अणुयुद्ध टाळण्यासाठी त्यांनी काहीतरी केले पाहिजे. आम्ही प्रत्येक स्थितीसाठी सिद्ध आहोत. जर २ देशांमध्ये युद्ध झाले, तर काहीही होऊ शकते, अशी धमकीही इम्रान खान यांनी दिली.
(म्हणे) ‘संचारबंदी उठवल्यावर काश्मीरमध्ये रक्ताचे पाट वाहतील !’
काश्मीरमधील संचारबंदी उठवण्यात आल्यावर काय होईल ? मोदी तेव्हा काय करतील ? त्यांना वाटते की, काश्मीरचे लोक परिस्थिती स्वीकारतील ? तथापि संचारबंदी उठवल्यावर काश्मीरमध्ये रक्ताचे पाट वाहतील, तसेच लोक रस्त्यावर येतील, तेव्हा काय करायचे याचा विचार मोदी यांनी केला आहे का ? (काश्मीरमध्ये आता असे होत नाही, याचेच पाकला आणि इम्रान खान यांना दुःख आहे ! तरीही तेथे नरसंहार होत आहे, असा खोटा प्रचार पाक करत आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात