चिंचवड : ‘सार्वजनिक नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबावेत आणि आदर्श नवरात्रोत्सव साजरा व्हावा’, याविषयी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. ‘चित्रपटगीतांच्या तालावर गरबा खेळणे, मद्यपान करणे, अश्लील अंगविक्षेप करत नाचणे, बळजोरीने वर्गणी घेणे, मंडपातून जुगार खेळणे आदी अपप्रकार नवरात्रोत्सवात घडतांना दिसतात. असे अपप्रकार होऊ नयेत आणि उत्सव आदर्शरित्या साजरा व्हावा’, असे या निवेदनात म्हटले आहे. संदीप बिष्णाई यांनी हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले असल्याची प्रतिक्रिया या वेळी व्यक्त केली. ‘आदर्श उत्सवाच्या संदर्भात पोलीस उपायुक्तांना त्वरित सूचना देण्यात येतील’, असेही ते म्हणाले.