न्यूयॉर्क टाइम्स दैनिक भारतविरोधी असल्याने अशा प्रकारच्या विज्ञापने त्यात प्रसिद्ध होणे अनपेक्षित म्हणता येणार नाही; मात्र अशी कितीही खोटी विज्ञापने आणि लेख प्रसिद्ध करून काश्मीरमधील वस्तूस्थिती लपवता येणार नाही, हे पाकनेही लक्षात ठेवावे !
नवी देहली : अमेरिकेतील ‘न्यूयॉर्क टाइम्स’ दैनिकाने त्यांच्या पहिल्या पानावर काश्मीरविषयी भारतविरोधी पानभर विज्ञापन प्रसिद्ध केले आहे. काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये लाखो लोकांवर निर्बंध लादण्यात आले असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. ‘इंटरनॅशनल ह्यूमॅनिटॅरिअन फाऊंडेशन’ने हे विज्ञापन प्रायोजित केले आहे. केनिया, इंडोनेशिया आणि थायलंड या देशात या संस्थेचे कार्य चालते.
१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने काश्मीरचे सूत्रे सोडवण्यासाठी पाकिस्तानसमवेत कोणतीही चर्चा किंवा मध्यस्थी यांविषयीचा प्रस्ताव नाकारल्याचे यामध्ये म्हटले आहे.
२. यापूर्वी २८ सप्टेंबर २०१४ या दिवशी ‘इंडियाज् बजेट मिशन’ या नावाने प्रसिद्ध केलेल्या एका व्यंगचित्रामध्ये न्यूयॉर्क टाइम्सने भारताच्या ‘गगनयान’ मोहिमेची खिल्ली उडवली होती. यास जगभरातून विरोध झाला होता. त्यानंतर याप्रकरणी सदर वृत्तपत्राने क्षमा मागितली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात