मालिकेमध्ये हिंदूंविषयी चुकीची माहिती प्रसारित
अशा प्रकारच्या वेबसिरीजमधून भारत, हिंदू आणि हिंदूंच्या संघटना यांचा होणारा अवमान रोखण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ पावले उचलणे आवश्यक आहे !
नवी देहली : ‘अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ’वर प्रसारित झालेल्या ‘द फॅमिली मॅन’ या वेबसीरिजला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध केला आहे. या मालिकेतून हिंदूंविषयी आक्षेपार्ह माहिती प्रसारित केली जात आहे, असे संघाने म्हटले आहे. या मालिकेमध्ये भारत- पाकिस्तान युद्ध, जिहाद, आतंकवादी संघटना, धार्मिक दंगली यांसारख्या सूत्रांचा समावेश करण्यात आला आहे.
१. संघाच्या ‘पांचजन्य’ या मासिकातून हा विरोध करण्यात आला आहे. यात एक लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. या लेखात म्हटले आहे की, हिंदूंनी कधीच काश्मीरमधील नागरिकांवर अत्याचार केले नाहीत.
देशात झालेल्या दंगलींना हिंदू उत्तरदायी नव्हते. तसेच ‘सीरियामधून प्रशिक्षण घेऊन आलेले इस्लामी आतंकवादी हिंदूंच्या अत्याचाराला कंटाळून आतंकवादी झाले,’ असा या मालिकेत देण्यात आलेला संदर्भ चुकीचा आहे. या मालिकेची निर्मिती देशद्रोही प्रवृत्तीतून करण्यात आली आहे.
२. याआधी अशाच प्रकारची टीका या मासिकाने ‘सेक्रेड गेम्स’ आणि ‘घोल’ या मालिकांवरही केली होती.
३. या मालिकेमध्ये श्रीकांत तिवारी नावाच्या एका मध्यमवर्गीय माणसाची कथा दाखवण्यात आली आहे. हा माणूस त्याच्या कुटुंबासमोर तो अत्यंत घाबरट असल्याचे नाटक करतो, तर दुसरीकडे तो भारतातील चांगल्या गुप्तहेरांपैकी एक आहे. ‘नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी’च्या एका विशेष पथकासाठी काम करणार्या श्रीकांतच्या या दुहेरी आयुष्यात घडणार्या घटनांवर आधारित ही नवी मालिका आहे. या मालिकेत मनोज वाजपेयी याची प्रमुख भूमिका आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात