Menu Close

(म्हणे) ‘काश्मिरी हिंदूंचे दुःख हिंदुत्वनिष्ठांना मिळालेले शस्त्र !’ – मेहबूबा मुफ्ती

  • ‘काश्मीरमधील मुसलमानांवरील कथित अत्याचार हे इम्रान खान, फुटीरतावादी, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी, पाकप्रेमी यांना मिळालेले शस्त्र आहे’, असे म्हणायचे का ?
  • काश्मिरी हिंदूंच्या वाट्याला आलेल्या दुःखाला मेहबूबा मुफ्ती यांच्यासारख्या काश्मिरी नेत्या उत्तरदायी आहेत. त्यांनी कधीही या हिंदूंचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला नाही. उलट या हिंदूंचा दुःस्वास केला. याविषयी मेहबूबा मुफ्ती का बोलत नाहीत ?

श्रीनगर : काश्मिरी मुसलमानांवर वर्ष १९९० मध्ये हिंदूंना काश्मीरमधून पळवून लावल्याचा आरोप केला जातो. यासाठी त्यांना उत्तरदायी ठरवले जाते. काश्मिरी हिंदूंचे दुःख आता हिंदुत्वनिष्ठांच्या हातामधील एक शस्त्र बनले आहे. गांधी यांच्या स्वप्नातील धमनिरपेक्ष भारत एक निरंकुश शासनाच्या जोखडामध्ये अडकला आहे, असे ट्वीट मेहबूबा मुफ्ती यांनी केले आहे.

मेहबूबा मुफ्ती सध्या नजरकैदेत आहेत. त्यांचे ट्विटर खाते त्यांची मुलगी इल्तिजा संचालित करत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *