कोलकाता : ‘आंतरराष्ट्रीय वेदांत सोसायटी’चे संस्थापक श्री श्री भगवान यांचा युरोप येथील आध्यात्मिक दौरा यशस्वी झाल्यानिमित्त कृतज्ञता म्हणून येथे एका समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभामध्ये हिंदु जनजागृती समितीला निमंत्रित करण्यात आले होते. या वेळी समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत समन्वयक श्री. शंभू गवारे यांनी श्री श्री भगवान यांची भेट घेऊन त्यांना समिती करत असलेल्या राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या कार्याची माहिती दिली, तसेच या कार्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी श्री श्री भगवान यांनी, ‘आमचे आणि तुमचे कार्य एकच आहे’, असे उद्गार काढले. श्री श्री भगवान यांनी वर्ष १९८९ मध्ये आंतरराष्ट्रीय वेदांत सोसायटीची स्थापना केली. ही संस्था भारतात वेद आणि अध्यात्म यांचा प्रसार करण्याचे कार्य करते.
आंतरराष्ट्रीय वेदांत सोसायटीचे संस्थापक श्री श्री भगवान यांचे हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला आशीर्वाद
Tags : Hindu Janajagruti Samiti