Menu Close

हिंदूंना घाबरवण्यासाठीच पाकच्या सिंधमध्ये दंगल घडवून हिंसाचार : सरकारी चौकशी समितीचा अहवाल

जगासमोर ‘काश्मीरमध्ये अत्याचार होत आहे, नरसंहार होत आहे’, असे ओरडून खोटे बोलणार्‍या पाकमध्ये अल्पसंख्याकांची काय स्थिती आहे, हे सरकारचीच समिती सांगत आहे ! ‘काश्मीरमधील स्थिती पाहून जगातील एखादा मुसलमान हातात बंदूक घेईल’, असे म्हणणारे इम्रान खान याविषयी का बोलत नाहीत ?

इस्लामाबाद : पाकच्या सिंध प्रांतातील घोटकी येथे १५ सप्टेंबर या दिवशी झालेली हिंदुविरोधी हिंसा हे तेथे दंगल घडवून हिंदूंना घाबरवण्यासाठी रचलेले षड्यंत्र होते, असा दावा या घटनेची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या एका समितीने तिच्या अहवालामध्ये केला आहे. या हिंसाचारामध्ये हिंदूंची अनेक दुकाने आणि घरे यांची तोडफोड करून ती लुटण्यात आली. तसेच एका मंदिरातही तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी २० जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

एका हिंदु शिक्षकावर मुसलमान विद्यार्थ्याने ईशनिंदा केल्याचा आरोप केल्यानंतर हा हिंसाचार घडला होता. हा शिक्षक या विद्यार्थ्याला ओरडला होता. त्याचा राग म्हणून या विद्यार्थ्याने खोटा आरोप लावून हा हिंसाचार घडवून आणला. नंतर या विद्यार्थ्याने शिक्षकाची क्षमा मागितली होती. यानंतर या घटनेच्या चौकशीसाठी सरकारकडून समिती नेमण्यात आली होती. यात हिंदु खासदार, अधिवक्ता, मानवाधिकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *