Menu Close

अहिंदूंना गरबा खेळायचा असेल, तर त्यांनी हिंदु धर्म स्वीकारावा ! – आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद

आता पुरोगामी आणि निधर्मीवादी सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली याला विरोध करतील आणि प्रसारमाध्यमे त्यास वारेमाप प्रसिद्ध देतील !

वडोदरा (गुजरात) : आम्ही गरबा आयोजकांना हे निश्‍चित करण्यास सांगितले आहे की, हिंदूंच्या या सणातील शुचितेच्या संदर्भात कोणतीही तडजोड केली जाऊ नये. जर एखादा अहिंदू गरबा खेळू इच्छितो, तर त्याला हिंदु धर्म स्वीकारावा लागेल, गोमूत्र प्राशन करावे लागेल. नंतरच तो गरबा खेळू शकतो, असे आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदचे सरचिटणीस रणछोड भारवाड यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी या परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगाडिया म्हणाले होते की, त्यांची संघटना गुजरातमध्ये गरब्याच्या ठिकाणी अहिंंदूंचा प्रवेश रोखण्यासाठी काम करत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *