- भूमाता रणरागिणी ब्रिगेडकडून मुख्यमंत्र्यांचा निषेध असो, अशा घोषणा
- मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या गृहमंत्री पदाच्या त्यागपत्राची मागणी !
तृप्ती देसाई यांना मंदिर परिसरातून पिटाळून लावल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्या म्हणाल्या, “चौथर्यावर आम्हाला जाऊ न देणे, हा न्यायालयाचा अवमान असून आज लोकशाहीची हत्या झाली आहे. आम्हाला जोपर्यंत चौथर्यावर जाऊन दर्शन घेऊ दिले जाणार नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही. पोलिसांनी जर आम्हाला संरक्षण पुरवून दर्शन घेऊ दिले नाही, तर पोलिसांसह मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आम्ही एफ्.आय.आर्. नोंद करू” त्या पुढे म्हणाल्या, “फडणवीस यांनी त्यांच्या गृहमंत्रीपदाचे तातडीने त्यागपत्र द्यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी विनंती करते की, त्यांनी ‘फडणवीस यांना महिलांना चौथर्यावर दर्शन घेऊ द्यावे’, असा आदेश द्यावा.”
भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या गोंधळामुळे असंख्य भाविक श्री शनिदेवाच्या दर्शनापासून वंचित
शनिवार असल्याने आपल्या आराध्य शनिदेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात मंदिरात आले होते; परंतु भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळामुळे असंख्य भाविकांना दर्शन न घेताच परतावे लागले.
मुसलमानांच्या धार्मिक बाबींच्या विरोधात एक शब्द जरी उच्चारला, तरी सर्व राजकीय पक्षांतील मुसलमान पक्षभेद विसरून एक होतात. याउलट हिंदूंच्या शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या प्रथा-परंपरा पायदळी तुडवल्या जात असतांना हिंदु नेते त्यांचे रक्षण करणे तर सोडाच उलट त्यास हातभार लावतात !