कोलकाता : येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर समन्वयक श्री. शंभू गवारे यांनी संबोधित केले. या वेळी ‘बंगालमधील हिंदूंची स्थिती’, ‘हिंदूंच्या समस्यावरील उपाय’, ‘हिंंदुत्वाच्या कार्यात महिलांचा सहभाग’, ‘देवतांचे होणारे विडंंबन वैध मार्गाने थांबवणे’ आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. ‘आमच्या भागांत हिंदु धर्मासाठी कार्य करण्याचा प्रयत्न करू’, असे सर्व उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी सांगितले. या बैठकीला सलकिया भारतीय साधक समाजाचे अध्यक्ष श्री. अनिर्बान नियोगी, सदस्य श्री. मानस सिंह, हिंदु मिशनचे अध्यक्ष श्री. नकुल जाना, श्रीकृष्ण सेनेचे अध्यक्ष श्री. विजय यादव, सदस्य श्री. धीरज राय, हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीरज साह, हिंदु धर्माभिमानी श्री. सागर बाग तथा श्री. सुमंतो मुखर्जी उपस्थित होते.
कोलकाता येथे हिंदु जनजागृती समितीच्या बैठकीला हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Tags : Hindu Janajagruti Samiti