धुबरी (आसाम) येथे हिंदु जनजागृती समितीचे शासनाला निवेदन
धुबरी (आसाम) : केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि समान नागरी कायदा लागू करावा, आंध्रप्रदेश सरकारकडून हिंदूंच्या मंदिरांवर करण्यात येत असलेल्या विविध धार्मिक अन्यायाच्या विरोधात कृती करावी, देहली विश्वविद्यालयातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मूर्तीची विटंबना करणार्या अक्षय लाकड याला अटक करावी, तसेच पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराच्या सुरक्षेच्या नावाखाली तेथील प्राचीन मठ आणि मंदिरे यांना अवैध ठरवून ती पाडण्याची राज्य सरकारची कारवाई थांबवावी, या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील उपायुक्त श्री. सोमन अली यांना निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे श्री. अमित बर्मन, तसेच धर्माभिमानी श्री. विशाल कुंडू, श्री. रणधीर सरकार आणि श्री. आशुतोष महंतो उपस्थित होते.