मूर्तीमुळे ख्रिस्ती बहुसंख्य राज्यात धार्मिक तणाव निर्माण होण्याचा दावा
- देशात हिंदू बहुसंख्य असतांनाही हा देश धर्मनिरपेक्ष झाला आणि त्याचे पालन हिंदू वगळता अन्य कोणी करत नाहीत, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले ! हिंदूंनी आता ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी कटीबद्ध झाले पाहिजे !
- भारतातील एखाद्या हिंदूबहुल राज्यात येशू ख्रिस्ताचा पुतळा काढण्याची एखाद्या हिंदु संघटनेने मागणी केली असती, तर तिला तथाकथित पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी यांच्याकडून ‘तालिबानी’ म्हटले गेले असते आणि तिच्यावर बंदी घालण्याची मागणी केली गेली असती !
- या घटनेवरून ख्रिस्तीबहुल मेघालयामध्ये हिंदूंची स्थिती कशी आहे, हे लक्षात येते ! सरकारने आतातरी तेथील हिंदूंना अल्पसंख्याक असल्याचा दर्जा देऊन त्यांचे रक्षण करावे !
- ‘हिंदूबहुल देशात ख्रिस्त्यांच्या श्रद्धास्थानांमुळे धार्मिक तणाव निर्माण होत नाही, तर ख्रिस्तीबहुल राज्यात हिंदूंच्या देवतेच्या मूर्तीमुळे तणाव का आणि कोण निर्माण करत आहे ?’, हे जनतेला कळले पाहिजे !
शिलाँग (मेघालय) : येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या संचालकांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर लावण्यात आलेली श्री गणेशाची मूर्ती काढण्यात आली आहे. येथील ‘जयन्टीआ स्टुडंट युनियन’ या विद्यार्थी संघटनेच्या विरोधामुळे ही मूर्ती काढण्यात आली. २३ सप्टेंबरला ही मूर्ती स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर याला विरोध झाल्यावर ३० सप्टेंबरला ती हटवण्यात आली. जयन्टीआ स्टुडंट युनियन या विद्यार्थी संघटनेने ही मूर्ती काढण्यासाठी संचालकांना निवेदन दिले होते. ‘ख्रिस्ती बहुसंख्य राज्यामध्ये यामुळे धार्मिक तणाव निर्माण होऊ शकतो’, असे यात म्हटले होते. या विद्यार्थी संघटनेने ‘येथे विज्ञान, साहित्य, कला आदी क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्तीची मूर्ती लावली पाहिजे’, असेही म्हटले होते.
संचालक विभूती भूषण बिस्वाल म्हणाले की, या श्री गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली नव्हती, तर केवळ ती येथे सजावटीचा भाग म्हणून ठेवण्यात आली होती. (हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती धार्मिकतेसाठी नाही, तर सजावटीसाठी वापरणारे हिंदू ! हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने त्यांना देवता आणि त्यांच्या मूर्ती अन् प्रतिमा यांचे महत्त्वच लक्षात येत नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ती लावण्यामागे कोणताही धार्मिक हेतू नव्हता. विद्यार्थ्यांनी त्याला वेगवेगळ्या दृष्टीने पाहिल्याने आम्ही ती मूर्ती हटवली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात