मिरज : नवरात्रीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती, तसेच सनातन संस्था यांच्या वतीने ठिकठिकाणी नवरात्रीचे महत्त्व, शास्त्र, तसेच अन्य माहिती सांगिणारी प्रवचने घेण्यात येत आहेत.
१. वैष्णवी देवी नवरात्र उत्सव मंडळ, तहसीलदार गल्ली नदीवेस येथे सौ. कांता वांडरे यांनी मार्गदर्शन केले. याचा लाभ ७८ भाविकांनी घेतला. येथे कुंकूमार्चनाचे प्रात्यक्षिक दाखवून ते करवून घेण्यात आले.
विशेष – कार्यक्रमाच्या पूर्वी पावसाचे वातावरण असूनही थोडा पाऊस आला; मात्र सभामंडपात पाणी आले नाही. कुंकूमार्चन पूर्ण झाल्यावरच पाऊस आला. यामुळे सर्वांची भावजागृती झाली.
२. स्वराज्य मंडळ येथे सौ. रत्ना भंगाळे यांनी प्रवचन घेतले.
सांगली
१. धर्मप्रेमी सौ. हिरेमठ यांच्या घरी कुंकूमार्चनाचे प्रात्यक्षिक दाखवून सामूहिक नामजप करवून घेण्यात आला. या वेळी उपस्थित महिलांना देवीच्या अस्तित्वाची अनुभूती आली, तसेच कुंकूमार्चन झाल्यावर लक्ष्मी देवीचा आकारही दिसला.
२. सांगलीवाडी येथील क्रांती कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ येथे श्रीमती मधुरा तोफखाने यांनी नवरात्र आणि दसरा यासंदर्भात मार्गदर्शन केले. या वेळी श्री दुर्गादेवीचा सामूहिक जप करवून घेण्यात आला. या वेळी ४० महिला आणि १० पुरुष उपस्थित होते.