Menu Close

शेडेगाळी (जिल्हा बेळगाव) येथील श्रीरामनाम दिंडीस ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

श्रीरामनाम दिंडीच्या समारोपप्रसंगी मार्गदर्शन करतांना हिंदु जनजागृती समितीच्या सौ. उज्ज्वला गावडे

बेळगाव : खानापूर तालुक्यातील शेडेगाळी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकत्याच काढलेल्या श्रीरामनाम दिंडीस ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्री चव्हाटा मंदिर येथे नामदिंडीचा प्रारंभ करण्यात आला, तर गावातील वेगवेगळ्या मार्गावरून जाऊन दुर्गामरगाईदेवी मंदिर परिसरात सांगता करण्यात आली. या दिंडीत २७० हून अधिक भक्तगण सहभागी झाले होते. दिंडीच्या सांगता प्रसंगी हिंदुत्वनिष्ठ श्री. पंकज घाडी, शिक्षक श्री. परशराम कुम्रतवाडकर, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. उज्ज्वला गावडे, ग्रामपंचायत सदस्य श्री. गणपती गुरव यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.

विशेष

१. नामदिंडीत वारकरी संप्रदाय आणि गावातील महिला कलश घेऊन टाळ-मृदंगाच्या गजरात आणि श्रीरामाचा नामजप करत सहभागी झाल्या होत्या.

२. श्री. गणपती गुरव म्हणाले, ‘‘फेरीत मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झालेले पाहून समाधान वाटले. यापुढेही भाविकांनी असेच संघटित होणे आवश्यक आहे.’’

३. ‘आय.टी.आय’ महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. अमृत गुरव यांनी दिंडी नियोजनबद्ध झाल्याचे सांगितले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *