जगातील एकही देश पाकच्या बाजूने नाही !
पाक सरकारचा खोटेपणा पाकच्याच माजी मंत्र्याने उघड केल्याने भारताला विशेष काही करण्याची आवश्यकता नाही ! आता भारतातील पाकप्रेमी आणि काश्मीरवरून छाती बडवणारे यावर काही बोलतील का ?
इस्लामाबाद (पाकिस्तान) : संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमध्ये इम्रान खान सरकारच्या सर्व कल्पना चुकीच्या ठरल्या. आमची कुटनीतीमधील दूही समोर आली. जगामध्ये पाकसमवेत कोणीही नाही, अशा शब्दांत पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री ख्वाजा महंमद आसिफ यांनी पाक सरकारवर टीका केली आहे. ख्वाजा हे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. ‘इम्रान खान आणि परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी ‘काश्मीरप्रश्नी ५८ देशांचा पाकला पाठिंबा आहे’, असे म्हटले होते, तरीही पाकला प्रस्तावाच्या वेळी कोणीही साहाय्य का केले नाही ?’, असा प्रश्न ख्वाजा यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी वरील टीका केली. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
ख्वाजा पुढे म्हणाले की, गेल्या १२ मासांपासून पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेले सर्व ट्वीट खोटे होते, उदा. समुद्रातून तेल काढण्याविषयीचे ट्वीट. त्याचे पुढे काय झाले ? वास्तविक तेल मिळण्याची शक्यता केवळ १२ टक्केच होती. आता ते हेही विसरले असतील की, त्यांनी किती खोटे ट्वीट केले आहेत ? अशा चुकांची इम्रान खान यांना लाजही वाटत नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात