Menu Close

बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून श्री हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड !

मूर्ती स्थापन करण्यास गेलेल्या हिंदूंवर धर्मांधांचे आक्रमण !

  • हिंदूंना ‘असहिष्णु’ ठरवणारे अशा घटनांनंतर तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • उत्तरप्रदेश सरकारने यातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे !

बिजनौर (उत्तरप्रदेश) : येथील विश्‍नोईवाला गावामधील पुरातन श्री हनुमान मंदिरामध्ये हनुमानाची मूर्ती स्थापन करण्यासाठी जाणार्‍या हिंदूंवर धर्मांधांनी मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली. यात श्री हनुमानाची मूर्ती भंगली. दगडफेक करण्यासाठी धर्मांधांनी आधीपासूनच घराच्या छतावर दगड जमा करून ठेवले होते. पोलिसांनी या प्रकरणी १८ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवून सगीर अहमद, नईम, सद्दीक अहमद, रियाज अहमद, इरफान अहमद, असगर, शबाना, नईमा, शमा अशा ९ जणांना अटक केली आहे.

३ मासांपूर्वी येथील श्री हनुमान मंदिरातील मूर्ती अज्ञातांनी तोडली होती. (‘मंदिरात पुन्हा मूर्ती बसवण्यासाठी विरोध करणार्‍या धर्मांधांनीच ही मूर्ती तोडली असणार’, असे या घटनेनंतर कोणाला वाटल्यास चूक ते काय ? पोलिसांनी या दृष्टीने अन्वेषण केले पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) तेथे दुसरी मूर्ती बसवण्यासाठी हिंदू जात होते. त्या वेळी शकील, सलीम, ताहिर आणि अन्य काही जण यांनी धर्मांधांच्या जमावाचे नेतृत्व करत हिंदूंची मिरवणूक रोखली अन् त्यांनी नवीन मूर्ती स्थापन करण्यास विरोध केला. हिंदूंनी त्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करत पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यावर धर्मांधांच्या जमावाने हिंदूंवर दगडफेक चालू केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *