संतप्त स्थानिक हिंदूंची बांधकामाच्या संदर्भात कारवाई व्हावी यासाठी स्वाक्षरी मोहीम !
मुंबई : चुनाभट्टी येथे राहणार्या एका मुसलमान महिलेने येथील हिंदु स्मशानभूमीच्या जागेत अनधिकृत बांधकाम केले आहे. (हिंदूंच्या स्मशानभूमीत अनधिकृत बांधकाम करणारे उद्दाम धर्मांध ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या विरोधात पंचशीलनगर येथील जागरूक धर्माभिमानी युवकांनी स्वाक्षरी मोहीम चालू केली आहे. (अनधिकृत बांधकामाच्या विरोध आवाज उठवणार्या धर्माभिमानी युवकांचे अभिनंदन ! असे जागरूक युवक हीच राष्ट्राची शक्ती आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) वर्ष २०१५ मध्ये स्थानिक नगरसेवक श्री. विजय तांडेल यांनी अनधिकृत बांधकामाच्या विरोधात महानगरपालिकेकडे तक्रार केली होती; मात्र पालिकेकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. (एका लोकप्रतिनिधीच्या पत्राची नोंद न घेणारी महानगरपालिका सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची कशी नोंद घेत असेल, याचा विचारच न केलेला बरा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ३१ मार्च २०१६ च्या रात्री हे अनधिकृत बांधकाम वाढवण्यात येत असल्याचे जागरूक धर्माभिमान्यांच्या लक्षात आली. याविषयी धर्माभिमानी युवकांनी त्वरित दूरध्वनीवरून पोलिसांत तक्रार केली. तिसर्यांदा दूरभाष केल्यावर पोलिसानी बांधकाम रोखले. (पोलिसांच्या अशा कृतींमुळेच समाजातील त्यांची विश्वासार्हता अल्प झाली आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
अनधिकृत बांधकामाविषयी जागृती होण्यासाठी धर्माभिमान्यांकडून पंचशीलनगर आणि आजूबाजूच्या परिसरात राबवण्यात येत असलेल्या स्वाक्षरी मोहिमेला स्थानिक तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मोहिमेत परिसारातील २५-३० तरुण उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. निवेदनावर २५० हून अधिक जागरूक नागरिकांनी स्वाक्षरी करून बांधकामाला विरोध दर्शवला आहे. युवकांनी एकत्र येऊन स्थानिक नगरसेवक श्री. विजय तांडेल यांची भेट घेऊन त्यांना या बांधकामाविषयी सांगितले. याची नोंद घेत नगरसेवक श्री. तांडेल यांनी या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात १ एप्रिल या दिवशी चुनाभट्टी पोलीस स्थानकात निवेदन दिले आहे. या निवेदनामध्ये अनधिकृत बांधकामाच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतांना पंचशीलनगर आणि आजूबाजूच्या विभागातील ८० हून अधिक जागरूक युवक उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात