ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथे योग प्रशिक्षणवर्गात प्रवचन
ग्वाल्हेर : आज ब्रेड, बर्गर, पिझ्झा आणि फास्टफूड खाण्याकडे सर्वांचे आकर्षण आहे. आहार, वस्त्र, आचरण, दिनचर्या या सर्वांवर आज पाश्चात्त्य जीवनशैलीचा प्रभाव आहे. भारतात ऋषिमुनींनी दिलेली शास्त्रशुद्ध जीवनशैली सोडून आपण पाश्चात्त्य जीवनशैलीकडे पळत आहोत, हेच वाढत्या रोगांचे कारण आहे. उत्तम स्वास्थ्यासाठी पाश्चात्त्य जीवनशैलीला हद्दपार करा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंद जाखोटिया यांनी केले. ते येथील इटालियन गार्डनमध्ये आयोजित योग प्रशिक्षणवर्गात मार्गदर्शन करत होते. योग प्रशिक्षक सौ. बुली सेंगर यांच्या साहाय्याने या प्रवचनाचे आयोजन झाले.
श्री. जाखोटिया पुढे म्हणाले, ‘‘आजार बळावण्यामागे आध्यात्मिक कारणही असू शकते; मात्र याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. सनातन धर्म सांगतो की, गत जन्मातील चुकीच्या कर्मांमुळेही आजार होऊ शकतात. पितरांना गती न मिळाल्यानेही अनेक समस्या जीवनात येऊ शकतात. औषधोपचारांना नामजपाची जोड दिली, तर आपण या समस्यांपासून मुक्त होऊ शकतो.’’
क्षणचित्रे
१. योग प्रशिक्षणवर्गाला आलेल्या जिज्ञासूंसह येथील इटालियन गार्डनमध्ये फिरायला आलेल्या अनेकांनी या प्रवचनाचा लाभ घेतला.
२. काही जणांनी सनातन संस्थेने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि पंचांग यांचा लाभ घेतला.