इम्फाळ (मणीपूर) : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील थंगलबझारमध्ये स्थानिक हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये हिंदु जनजागृती समितीचे श्री. शंभू गवारे यांनी समितीच्या राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या कार्याचा परिचय करून दिला, तसेच धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची आवश्यकता, सेक्युलरवादाच्या नावाने हिंदु समाजावर होत असलेला अन्याय इत्यादी विषयांची माहिती दिली. या वेळी समविचारी संघटनांनी एकत्र येऊन उपक्रम राबवण्याविषयी चर्चा करण्यात आली. या बैठकीला ‘ऑल मणीपूर धर्म रक्षा समिती’चे श्री. दिम्बेश्वर शर्मा, श्री. रूपचंद्र शर्मा आणि श्री. बोनार्ड शर्मा, इस्कॉन मंदिर संचालित पाठशाळेचे जनसंपर्क अधिकारी श्री. खेल शर्मा, श्री. चैतन्य शेकडे आदी उपस्थित होते. श्री. दिम्बेश्वर शर्मा यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.
इम्फाळ (मणीपूर) येथील हिंदु जनजागृती समितीच्या बैठकीला हिंदुत्वनिष्ठांचा सक्रीय सहभाग
Tags : Hindu Janajagruti Samiti