Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नवरात्रोत्सव मंडळात श्री दुर्गादेवीचा सामूहिक नामजप

सामूहिक नामजप करतांना उपस्थित महिला

सोलापूर : येथील सी वन ग्रुप, विजय मारुति चौकातील तुळजाभवानी नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने कुंकूमार्चनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी महिलांना सनातन संस्थेच्या श्री दुर्गादेवीच्या १०० नामपट्ट्यांचे वितरण करण्यात आले, तसेच या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या श्रीमती वीणा साखरे यांनी महिलांकडून श्री दुर्गादेवीचा सामूहिक नामजप करून घेतला. या वेळी ६० हून अधिक महिला आणि मंडळातील कार्यकर्ते यांनी नामजपाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी धर्मप्रेमी आणि सनातन प्रभातचे वाचक श्री. सतीश धुळम यांनी पुढाकार घेतला.

क्षणचित्रे

१. कार्यक्रमाच्या वेळी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

२. ग्रंथ प्रदर्शनाच्या ठिकाणी धर्मशिक्षणवर्गाला येणार्‍या कु. भावना दिड्डी आणि सौ. लक्ष्मी धुळम यांनी उत्स्फूर्तपणे सेवा केली.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *