Menu Close

शनिशिंगणापूर प्रकरणी हिंदु जनजागृती समितीची भूमिका अतिशय योग्य : प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज

kolhapur

कोल्हापूर : शनिशिंगणापूर प्रकरणात हिंदु जनजागृती समितीने घेतलेली भूमिका अत्यंत योग्य आहे. मी सकाळीच संकेतस्थळावर दैनिक सनातन प्रभातमध्ये सर्व वृत्त वाचले आहे. समितीचे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज (पूर्वाश्रीमीचे आचार्य किशोरजी व्यास) यांनी काढले. प.पू. महाराजांची ३ एप्रिल या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे डॉ. मानसिंग शिंदे, तसेच बांधकाम व्यावसायिक श्री. आनंद पाटील यांनी श्री. नारायण रामचंद्र बुधले यांच्या घरी दर्शन घेतले. त्या वेळी ते बोलत होते.

डॉ. मानसिंग शिंदे यांनी प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचा शाल, श्रीफळ, तसेच गोसंवर्धन हा ग्रंथ भेट देऊन सन्मान केला. शनिशिंगणापूर येथील आंदोलनाविषयी महत्त्वपूर्ण वृत्त असणारा दैनिक सनातन प्रभातचा ३ एप्रिल या दिवशीचा अंकही प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांना भेट देण्यात आला. मार्केटयार्ड रोड, प्रज्ञापुरी येथील श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळाच्या वतीने श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळ्याच्या निमित्ताने १ ते ५ एप्रिल या कालावधीत होत असलेल्या श्रीराम ज्ञानयज्ञासाठी प.पू. गोविंददेवगिरीजी महाराज कोल्हापुरात आले आहेत. त्यांचे व्याख्यान सकाळी ९.३० ते १२ आणि सायंकाळी ५ ते ७.३० या वेळेत होत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *