Menu Close

‘दुर्गाष्टमीदिनी ‘लव्ह जिहाद’पासून आपल्या मुलींचे रक्षण करण्याचा संकल्प करूया !’

‘ब्रतुकम्मा’ उत्सवात बोलतांना श्रीमती अलका व्हनमारे आणि उपस्थित अन्य मान्यवर

सोलापूर : ‘आयुष्यवंत हो’, असा आशीर्वाद आपल्या मुलींना देणारा ‘ब्रतुकम्मा’ हा उत्सव पद्मशाली समाजामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. एकीकडे आपण आपल्या मुलींच्या रक्षणासाठी हे व्रत करतो; पण आपल्या मुली खरोखरच सुरक्षित आहेत का ? त्या मोठ्या प्रमाणात ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत आहेत. या समस्येवर घाला घालण्यासाठी मुलींना धर्माचरण आणि साधना शिकवणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाला आपल्या घरापासूनच मुलींना धर्माचरण शिकवावे लागणार आहे. त्यामुळे आजच्या दुर्गाष्टमीच्या मंगलदिनी ‘लव्ह जिहाद’ पासून आपल्या मुलींचे रक्षण करण्याचा संकल्प करूया, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या श्रीमती अलका व्हनमारे यांनी केले.

श्रीकृष्ण सांस्कृतिक कला आणि क्रीडा बहुउद्देशीय संस्था सोलापूर यांच्या वतीने ६ ऑक्टोबर या दिवशी नवरात्रोत्सवानिमित्त ‘ब्रतुकम्मा’ उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवामध्ये त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन श्री. नागेश सरगम यांनी केले होते. या वेळी ३०० हून अधिक महिला उपस्थित होत्या.

विशेष : या कार्यक्रमाच्या दिवशी रणरागिणी शाखेचा ११ वा वर्धापनदिनही होता.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *