-
श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौडीचा समारोप
-
पुढील गडकोट मोहीम ‘प्रतापगड ते रसाळगड’ अशी होईल, असे पू. भिडेगुरुजी यांनी घोषित केले.
सांगली : छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या स्वत:च्या संसाराची कधीच आठवण होत नसे. सप्तसिंधु मुक्त करणे, हेच त्यांचे ध्येय होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी केवळ धर्म, स्वातंत्र्य आणि यवनमुक्तता यांची उपासना केली, असे मार्गदर्शन श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. ते श्री दुर्गामाता दौडीच्या समारोपप्रसंगी ८ ऑक्टोबर या दिवशी धारकर्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. या वेळी धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी पू. भिडेगुरुजी म्हणाले की,
१. छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या शेवटच्या काळात खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी पाण्यात उभे राहून गायत्री मंत्र सिद्ध केला. त्यामुळे तेजाची शक्ती देणारा ‘शिवाजी-संभाजी’ मंत्रच परिवर्तन घडवणार आहे.
२. सध्या देशात धर्म आणि देश द्रोह यांचे प्रमाण वाढले आहे. हे पालटण्यासाठी ‘शिवाजी-संभाजी’ मंत्रच त्यावर उपाय आहे.
३. ‘राष्ट्रीयत्व म्हणजेच हिंदुत्व’ हेच ध्येय डोळ्यांसमोर ठेवून येत्या ६ मासांत १ लाख लोकांपर्यंत आपल्याला पोचायचे आहे.
क्षणचित्रे
१. या अगोदर प्रारंभी सकाळी श्री दुर्गामाता मंदिरासमोर झालेल्या कार्यक्रमप्रसंगी शिवसेनेचे खासदार श्री. धैर्यशील माने, भाजपचे आमदार श्री. सुधीरदादा गाडगीळ, तसेच करणी सेनेचे प्रमुख श्री. अजयसिंह सेंगर उपस्थित होते.
२. गावभागात दौडीचे प्रत्येक गल्ली आणि प्रत्येक मार्ग येथे स्वागत करण्यात आले. भगवे ध्वज, भगवे फेटे, तसेच विविध घोषणा यांमुळे वातावरण भगवेमय झाले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात