संचारबंदी लागू; दैनिकांचे वितरण आणि इंंटरनेट बंद !
काँग्रेसच्या राज्यात हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका असुरक्षित ! धर्मांधांना कायद्याचा धाक न राहिल्यामुळेच त्यांच्याकडून अशा कृती होत आहेत !
टोंक (राजस्थान) : येथील मालपुरा भागामध्ये दसर्याच्या दिवशी काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या वेळी धर्मांधांनी दगडफेक केल्याने येथे तणाव निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांनी येथे संचारबंदी लागू केली आहे. येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच येथील इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली आहे आणि दैनिकांचे वितरणही बंद करण्यात आले आहे. या घटनेमुळे रावणदहन झाले नाही. ते पहाटे साडेचार वाजता पोलीस, प्रशासन आणि पालिका यांनी केले.
दगडफेकीनंतर स्थानिक आमदार कन्हैयालाल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी प्रथम दसरा मैदान आणि नंतर पोलीस ठाणे येथे धरणे आंदोलन करून दगडफेक करणार्यांना अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी म्हटले की, सीसीटीव्हीच्या चित्रीकरणाच्या आधारे दगडफेक करणार्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. (आतापर्यंतचा अनुभव पाहाता पोलिसांनी नेहमी धर्मांधांनाच पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे धर्मांधांवर कारवाई होण्यासाठी हिंदूंनी शेवटपर्यंत पाठपुरावा घेणे आवश्यक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात