‘लव्ह जिहाद’ आणि अश्लीलता पसरवण्यात येत असल्याचा आरोप
नवी देहली : ‘कलर्स’ या खासगी दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणार्या ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाच्या १३ व्या सत्रामध्ये ‘लव्ह जिहाद’ आणि अश्लीलता पसरवण्यात येत असल्याची टीका सामाजिक माध्यमांतून होत आहे. या पार्श्वभूमीवर करणी सेनेने ‘बिग बॉस’ कार्यक्रम बंद करण्याची मागणी केली आहे. तसेच उत्तरप्रदेशातील गाझियाबादचे भाजपचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनीही केंद्र सरकारला या कार्यक्रमावर कारवाई करण्याविषयी पत्र लिहिले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने प्रसार भारतीकडून ‘बिग बॉस’विषयी सविस्तर माहिती मागवली आहे.
१. करणी सेनेेने सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, बिग बॉस हिंदु संस्कृतीचा राष्ट्रीय वाहिनींवरून अवमान करत आहे. यातून लव्ह जिहादला प्रोत्साहन दिले जात आहे. यातून अश्लीलता पसरवली जात आहे. हा कार्यक्रम परिवारासह पाहिला जाऊ शकत नाही.
२. करणी सेनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र लिहून ‘बिग बॉस’वर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Ghaziabad: BJP MLA from Loni, Nand Kishor Gurjar has written to Minister of Information & Broadcasting, Prakash Javadekar asking him to immediately stop the telecast of ‘Bigg Boss – 13’ alleging that the show is ‘spreading vulgarity & hurting the social morality of the country’. pic.twitter.com/JDh7HkXktH
— ANI UP (@ANINewsUP) October 10, 2019
३. आमदार नंदकिशोर यांनी त्यांच्या पत्रात लिहिले आहे की, या कार्यक्रमात वेगवेगळ्या धर्मांच्या भिन्न लिंगी लोकांना एका पलंगावर झोपण्यास सांगण्यात येत आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान भारतीय संस्कृतीला पुनर्वैभव मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे असे कार्यक्रम संस्कृती उद्ध्वस्त करत आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात