Menu Close

वर्षातील ३६५ दिवस आपण संघटित असायला हवे ! – सौ. उज्ज्वला गावडे, हिंदु जनजागृती समिती

बेळगाव जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नवरात्रोत्सव मंडळांमध्ये प्रवचन, कुंकूमार्चन आणि प्रथमोपचार प्रात्यक्षिके यांचे आयोजन

सौ. उज्ज्वला गावडे

चंदगड (जिल्हा बेळगाव) : केवळ नवरात्रीतील नऊ दिवस नव्हे, तर हिंदुत्व टिकवण्यासाठी वर्षातील ३६५ दिवस आपण संघटित असायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. उज्ज्वला गावडे यांनी केले. बेळगाव जिल्ह्यातील चंदगड येथे हिंदु राष्ट्र सेना संघटनेच्या वतीने नवरात्रीनिमित्त आयोजित कुंकूमार्चन आणि प्रवचन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी हिंदु राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. बाळू कुरबर उपस्थित होते. १०० हून अधिक महिलांनी याचा लाभ घेतला. या वेळी गावातील धर्मप्रेमी युवकही सहभागी झाले होते.

अन्य उपक्रम

१. नानावाडी येथील दुर्गादेवी उत्सव मंडळामध्ये नवरात्रीनिमित्त प्रवचन, कुंकूमार्चन आणि प्रथमोपचार आदी विषय घेण्यात आले. या वेळी सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या (सौ.) ज्योती दाभोळकर यांनी नवरात्रोत्सव कसा साजरा करावा आणि नवरात्रीमध्ये होणारे अपप्रकार कसे थांबवावे याविषयी मार्गदर्शन केले. याचा लाभ ६० महिलांनी घेतला.

२. चिन्नपट्टनम् गावांमध्ये नवरात्रीनिमित्त प्रवचन, कुंकूमार्चन आणि प्रथमोपचार यांविषयी सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या (सौ.) ज्योती दाभोळकर आणि डॉ. राजकुंवर देसाई यांनी मार्गदर्शन केले.

३. बेळगाव अनगोळच्या श्री मरगाई मंदिरामध्ये सौ. कांचन कलघटगी यांनी कुंकूमार्चन करून घेतले. या वेळी १०२ महिला उपस्थित होत्या.

४. खानापूर केंद्रात शेडेगाळी गावामध्ये श्री दुर्गादेवी मंदिरासमोर सामूहिक नामजप घेण्यात आला. या वेळी ८५ जण उपस्थित होते.

५. नंदिहळ्ळी केंद्रातील देसूर गावच्या नवरात्रोत्सव मंडळात झालेल्या प्रवचनाचा लाभ ५० जणांनी लाभ घेतला.

६. नंदिहळ्ळी केंद्रातील देसूर गावच्या कळसेकर गल्लीमध्ये नवरात्रीनिमित्त प्रवचन करून प्रथमोपचार प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.

७. रायबाग केंद्रातील श्री संतुबाई मंदिरामध्ये सौ. लता बडगेर यांनी नवरात्रीनिमित्त प्रवचन घेऊन कुंकूमार्चन केले, तसेच प्रथमोपचाराचा विषयही मांडला. याचा ४०० महिलांनी लाभ घेतला.

८. रायबाग केंद्रातील श्री अंबाभवानी मंदिरामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राखी बेळगावकर यांनी केलेल्या मार्गदर्शनाच्या वेळी १०० भाविक उपस्थित होते.

९. गोकाक केंद्रातील कल्लोळी गावात, तसेच बसवन्ना गावात प्रवचन आणि कुंकूमार्चन घेण्यात आले.

संघटना निराळ्या असल्या, तरी हिंदुत्वासाठी एकत्रित काम करूया ! – बाळू कुरबर, हिंदु राष्ट्र सेना, जिल्हाध्यक्ष

हिंदुजनजागृती समिती सांगत असलेले सण-उत्सव यांचे शास्त्र समजून गावकरी बांधवांनी ते कृतीत आणायला हवे. आपल्या संघटना निराळ्या असल्या, तरी आपण हिंदुत्वासाठी एकत्रित काम करूया.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *