बोईसर येथे विराट हिंदू संमेलन
बोईसर (पालघर) : जगाच्या पाठीवर हिंदूंसाठी एकही देश नाही, त्या दृष्टीने विचार केल्यास आपण जगात अल्पसंख्यांक आहोत. प्राचीन काळापासून हिंदु धर्मावर अनेक आघात झाले. हिंदु धर्म संपवण्यासाठी हे सर्व प्रयत्न चालू आहेत. तसेच चालू राहिल्यास धर्म नामशेष होईल. धर्म वाचवण्यासाठी हिंदूंनी संघटित झाले पाहिजे. संस्कार रक्षण आणि संस्कृती रक्षण झाले पाहिजे, असे मार्गदर्शन रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी केले. येथे घेण्यात आलेल्या विराट हिंदू संमेलनात ते बोलत होते. या वेळी विश्व हिंदु परिषदेचे डॉ. प्रवीण तोगाडिया हेही उपस्थित होते.
डॉ. प्रवीण तोगाडिया म्हणाले, हिंदूंमध्ये आज नेतृत्वच नसल्याने वारंवार त्यांच्यावर आक्रमणे होत आहेत. यासाठी हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचा आदर्श ठेवायला हवा. काश्मीरमधील राजा हरिसिंग याच्या काळात हिंदू, गाय, मंदिरे यांच्यावर कधीही अत्याचार झाले नाहीत. हिंदूंनी सुरक्षित जीवन जगण्यासाठी राजसत्ता आपल्या नियंत्रणात ठेवायला हवी.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात