नंदीहळ्ळी (जिल्हा बेळगाव) : येथे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ७ ऑक्टोबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या श्रीरामनाम दिंडीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. श्रीरामाच्या पालखी पूजनानंतर श्री लक्ष्मी मंदिरापासून दिंडीचा प्रारंभ झाला. ध्वजपूजन धर्मप्रेमी श्री. मारुति लोकुर, तर पालखीतील श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन सौ. आणि श्री. सुधीर राघोचे यांनी केले. श्री लक्ष्मी मंदिराजवळ ग्रामपंचायत अध्यक्ष श्री. शिवणागौड पाटील यांच्या हस्ते ध्वज उतरवून दिंडीची सांगता करण्यात आली. दिंडीत ४१० श्रीरामभक्त नामजप करत सहभागी झाले होते. समारोपप्रसंगी समितीच्या सौ. उज्ज्वला गावडे यांनी मार्गदर्शन केले.
क्षणचित्रे
१. दिंडीत सहभागी झालेले वारकरी टाळ-मृदुंग यांच्या तालावर भक्तीगीतांमध्ये रममाण होऊन नाचत होते.
२. पारंपरिक पद्धतीने सजवलेली बैलगाडी आणि त्यातील प्रभु श्रीरामचंद्र-लक्ष्मण यांची वेशभूषा केलेले युवा साधक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
३. कलश घेतलेल्या महिला, फुगडी खेळणार्या सुवासिनी हे दिंडीतील वैशिष्ट्य होते.