नवरात्रोत्सव मंडळांचा कृतीशील सहभाग
मुंबई : सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत भांडुप येथे गावदेवी टेकडी येथील गावदेवी मित्र मंडळ, सर्वोदय नगरचे सम्राट मित्र मंडळ, काजू टेकडी येथील नवदुर्गा क्रीडा मंडळ, टेंबीपाडामधील ज्वाला सेवा मंडळ आणि तेजस्विनी महिला सेवा मंडळ, राम नगरातील कोंढाळकर कंपाऊंड, घरगुती शिकवणीतील इयत्ता ८ वी ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी ‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने ‘नवरात्री आणि लव्ह जिहाद’ यांविषयी प्रवचन घेण्यात आले.
२६५ धर्मप्रेमी महिलांना नवरात्र आणि लव्ह जिहाद यांच्याविषयी अवगत केले
गावदेवी टेकडी येथील गावदेवी मित्र मंडळाच्या प्रांगणात अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक विकास मार्ग, नाशिक यांच्या भांडुप केंद्राच्या वतीने ‘दुर्गा सप्तशती पाठ पठण’ करण्यात आले. या वेळी उपस्थित २६५ धर्मप्रेमी महिलांना नवरात्र आणि लव्ह जिहाद यांच्याविषयी अवगत करण्यात आले. प्रवचनातून हे विषय अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी गावदेवी मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. सिद्धेश पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सनातन संस्थेच्या नवरात्रीविषयीच्या ‘पोस्ट’ आवडल्याने धर्मप्रेमींनी त्या सामाजिक प्रसारमाध्यमांना पाठवल्या
सर्वोदय नगर येथील सम्राट मित्र मंडळात मार्गदर्शनाचे आयोजन करण्यासाठी दैनिक सनातन प्रभातचे वाचक श्री. सदानंद सारंग यांनी साहाय्य केले. मंडळाचे पदाधिकारी श्री. सचिन पातेरे यांना व्हॉट्सअॅपवरील सनातन संस्थेच्या नवरात्रीविषयीच्या ‘पोस्ट’ आवडल्याने त्यांनी त्या तात्काळ मंडळाचा सामाजिक प्रसारमाध्यम गट आणि परिचयातील मंडळी यांंना पाठवल्या. नवदुर्गा क्रीडा मंडळ, काजू टेकडी येथे ४५ जणांनी प्रवचनाचा लाभ घेतला.
होतकरू विद्यार्थ्यांना सनातन संस्थेच्या लघुग्रंथांचे वितरण
ज्वाला सेवा मंडळ आणि तेजस्विनी महिला सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दांडिया, तुळशी वाटप आणि होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी धर्मप्रेमी श्री. संतोष ब्रीद यांचा त्यांच्या समाजसेवेसाठी ‘समाजभूषण’ पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. येथे समाजसेवक श्री. राजन (सुरेंद्र) गावडे, साप्ताहिक ‘यशोभारत टाइम्स’चे श्री. सुरेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. धर्मप्रेमी अधिवक्ता संतोष महामुनी यांचा कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रीय सहभाग होता. होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यासह सनातन संस्थेचे १० लघुग्रंथही विद्यार्थ्यांना देण्यात आले. या वेळी घेण्यात आलेल्या प्रवचनासाठी ६० जण उपस्थित होते. समितीच्या वतीने नवरात्रीविषयी शास्त्रीय माहिती सांगण्यात आल्याने मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, भाविक यांनी समाधान व्यक्त केले.
शिवशक्ती निवास, कोंढाळकर कंपाऊंड, राम नगर येथे माऊली सेवा प्रतिष्ठान आणि साप्ताहिक ‘यशोभारत टाइम्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रासगरबा आणि वेशभूषा स्पर्धा २०१९’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ही होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यासह सनातन संस्थेचे १० लघुग्रंथही विद्यार्थ्यांना देण्यात आले. येथे श्री. सुनील माने (चित्रकार), श्री. उदय शिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी करण्यात आलेल्या प्रवचनासाठी ८० जण उपस्थित होते. धर्मप्रेमी अधिवक्ता श्री. संतोष महामुनी यांचाही या कार्यक्रमात सक्रीय सहभाग होता.
विशेष
१. बाळ गोपाळ साई सेवक मित्र मंडळ येथे नवरात्रीविषयी माहिती देणारे ३ फ्लेेक्स फलक धर्मप्रेमी श्री. संतोष ब्रीद यांनी प्रायोजित करून लावले. तेथील सार्वजनिक नवरात्रोत्सवात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.
२. जयदुर्गा नगर सार्वजनिक उत्सव मंडळाने नवरात्रीविषयी धर्मशास्त्र सांगणारे ४ फ्लेक्स फलक प्रायोजित करून लावले.