रायगड : येथे शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने ठिकठिकाणी प्रवचनांच्या माध्यमातून ‘नवरात्रीचे शास्त्र आणि साधनेचे जीवनातील महत्त्व’ आदी विषयांची माहिती देण्यात आली. या वेळी नवरात्रोत्सव मंडळांमध्ये ‘देवीपूजनाचे शास्त्र’, ‘शक्तीची उपासना’, ‘अध्यात्मशास्त्र’ याविषयांच्या ग्रंथांचे प्रदर्शन लावून धर्मप्रसार करण्यात आला.
पनवेल
पनवेल येथील नांदगाव गावातील नंदादेवी मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. पुष्पा चौगुले यांनी प्रवचन घेतले. तुरमाळे येथे समितीचे श्री. राजेंद्र पावसकर यांनी मार्गदर्शन केले.
रसायनी
रसायनी येथील नारपोली गावात सनातन संस्थेच्या वतीने ‘नवरात्र कसे साजरे करावे ?’ आणि ‘कुलदेवतेचे महत्त्व’ यांविषयी प्रवचन घेण्यात आले. श्री. मनीष माळी यांनी या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रवचनाच्या ठिकाणी लावण्यात आलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या प्रदर्शनाला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला. रिस कांबा येथील वैष्णवी सोसायटीच्या नवरात्रोत्सव मंडळात समितीच्या वतीने सौ. नीला गडकरी आणि सौ. पुष्पा चौगुले यांनी ‘साधनेचे जीवनातील महत्त्व आणि काळानुसार स्वरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले.
महाड
श्री गणेशनाथ महाराज सेवा मंडळ खरवली-बिरवाडी येथील नवरात्रोत्सवात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘नवरात्र आणि धर्मशिक्षणाची आवश्यकता’ या विषयावर श्री. जगन्नाथ जांभळेगुरुजी यांनी प्रवचन घेतले. या वेळी मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार श्री. धोंडीराम कळसकर यांनी समितीचे श्री. जांभळेगुरुजी आणि सनातनचे श्री. सुदेश पालशेतकर यांचा सत्कार केला. ५५ जिज्ञासूंनी प्रवचनाचा लाभ घेतला.
पेण
पेण येथील डोलवी येथे २ ठिकाणी आणि कांदळे गाव येथे २ ठिकाणी समितीच्या वतीने ‘नवरात्र आणि जीवनातील साधनेचे महत्त्व’ या विषयावर श्री. जांभळेगुरुजी यांनी प्रवचन घेतले. या वेळी अनुक्रमे ७३ आणि ५६ जणांनी याचा लाभ घेतला.
नंदीमाळ नाका, पेण येथे ‘दसरा कसा साजरा करावा ?’ याविषयी समितीच्या सौ. शशिकला ठाकूर यांनी प्रवचन घेतले. येथे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.