- प्रसादाऐवजी रोपांचे वाटप करणे कितपत योग्य ? ‘प्रसादामध्ये देवतेचे चैतन्य असते. तो भावपूर्ण ग्रहण करणार्यास चैतन्याचा लाभ होतो’, असे धर्मशास्त्र आहे. त्यामुळे धर्मपरंपरा जपण्यासाठी हिंदूंनीच आता प्रयत्न करणे आवश्यक !
- अन्य पंथियांच्या श्रद्धास्थळी कधी असे निर्णय घेतल्याचे ऐकले आहे का ?
- झाडे लावण्याचे मुख्य दायित्व सरकारचे असून ते पार पाडतच आहे. मग प्रसादाची अनेक वर्षांची परंपरा बंद करून रोपे वाटण्याचा उपक्रम राबवण्यात काय हशील ? ही धर्महानी नव्हे का ?
- रोपे लावल्यानंतर किती भाविक सातत्याने त्यांची देखभाल करू शकतील ? त्यामुळे ‘हा उपक्रमच सवंग लोकप्रियतेसाठी आहे का ?’, असे कोणालाही वाटू शकते !
नगर : शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वर मंदिरात आता प्रसादाच्या ऐवजी लिंबाचे रोप वाटण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धर्मादाय सहआयुक्त देशमुख यांनी वरील सूचना केली असून मंदिराच्या विश्वस्तांनी ही सूचना स्वीकारली आहे. येत्या २ दिवसांत या निर्णयाची कार्यवाही होणार आहे.
भाविकांनी ही रोपे घेऊन ती घराच्या परिसरात लावणे अपेक्षित आहे. या मंदिरात प्रतिदिन ४० सहस्र भाविक येतात. १० टक्के भाविकांनी झाडे लावली तरी लाभ होईल, या हेतूने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. देवस्थानच्या मोकळ्या जागेत स्वतःची रोपवाटिका (नर्सरी) चालू करण्याची सूचना शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तांना देण्यात आल्या आहेत. ‘देवस्थानकडे ३०० ते ४०० कर्मचार्यांच्या सहकार्याने नर्सरी चालू करता येऊ शकेल’, असेही सहआयुक्तांनी सांगितले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात