अशी धमकी देणार्यांवर पोलीस काही कारवाई करतील का ? अशी भाषा जर एखाद्या हिंदु नेत्याने वापरली असती, तर त्याचा प्रसारमाध्यमे, पुरोगामी आदींनी प्रचंड गाजावाजा करून हिंदूंनी असहिष्णु ठरवले असते. आता ते सर्व गप्प का ?
संभाजीनगर : औरंगाबाद शहर आमच्या पूर्वजांचे आहे. जुन्या शहरांची नावे काय पालटता ? विरोधक औरंगाबाद शहराचे नाव पालटण्याविषयी बोलत आहेत; पण त्यांच्यात शक्ती नाही. त्यांनी शहराचे नाव पालटण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे अत्यंत वाईट परिणाम होतील, अशी धमकी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी दिली. ११ ऑक्टोबरला पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.
आझमी पुढे म्हणाले, ‘‘मॉब लिंचिंग (झुंडबळी) केले जात आहे. गोहत्येच्या संशयावरून मुसलमान समाजाला लक्ष्य करण्यात येत आहे. देशाची परिस्थिती अत्यंत वाईट आणि चिंताजनक आहे. ‘श्रीराम’ आणि ‘वन्दे मातरम्’ न म्हटल्यास देशात राहण्याचा हक्क नाही’, असे म्हणत अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य करण्यात येत आहे. ज्याप्रमाणे आतंकवादी कारवाया करणार्यांवर कठोर कारवाई केली जाते, त्याप्रमाणे ‘मॉब लिंचिंग’ करणार्यांवरही कठोर कारवाई केली पाहिजे.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
ये हिंदू देवता तो दिख रहे है, भगवान विष्णु कैसे. कृपया बताये.