उत्तरप्रदेशात अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !
बलरामपूर (उत्तरप्रदेश) – येथील हरखडी गावामध्ये श्री दुर्गादेवी मूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक मशिदीजवळ आल्यावर धर्मांधांनी त्यावर केलेल्या दगडफेकीमध्ये १६ जण घायाळ झाले. धर्मांधांनी धारदार शस्त्रे, लाठीकाठी आणि दगड यांद्वारे या मिरवणुकीवर आक्रमण केले. या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांना अटक केली. येथील तणावामुळे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
उपरोक्त प्रकरण में पुलिस ने मौके से 8 अराजक लोगों को गिरफ्तार कर लिया है। गंभीर धाराओं में अभियोग पंजीकृत कर लिया गया है। जुलूस सकुशल सम्पन्न हो गया है। मौके पर शांति व्यवस्था कायम है। पुलिस बल तैनात है। @Uppolice @ANI @JagranNews @Live_Hindustan https://t.co/D8JYVDAKHQ
— BALRAMPUR POLICE (@balrampurpolice) October 8, 2019
मिरवणुकीत डीजे वाजवण्यात येत होता. त्याला धर्मांधांनी विरोध केला आणि त्यातून झालेल्या वादातून हे आक्रमण करण्यात आले. (देशातील प्रत्येक मशिदीवरून दिवसभरात ५ वेळा भोंग्यांवरून अजान ऐकवली जाते, याचा हिंदू कधी विरोध करतात का ? तरीही असहिष्णु धर्मांधांकडून हिंदूंवर अशा प्रकारची आक्रमणे सातत्याने होत असतात आणि हिंदू सहिष्णुपणा दाखवतात ! याविषयी देशातील एकही पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी बोलत नाहीत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) अशाच प्रकारची घटना बलरामपूर येथील भुसैलिया आणि खैरी या गावांमध्येही घडली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात