इम्फाळ (मणीपूर) : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील मारवाडी समाजाच्या सनातन मंदिरामध्ये धर्माचरणाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. पुरुषांसाठी आयोजित करण्यात या प्रवचनामध्ये हिंदु जनजागृती समितीचे श्री. शंभू गवारे यांनी ‘गणपतीला लाल फूल का वाहावे ?, श्रीकृष्ण आणि श्रीविष्णु यांना तुळस अर्पण का करतात ?’ आदी धार्मिक कृतींमागील शास्त्र विषद केले, तसेच ‘पुरुषांनी कुंकवाचा लाल टिळा का लावावा ?’ यामागील शास्त्रही सांगितले. या वेळी उपस्थितांनी समितीच्या कार्याची प्रशंसा केली. या कार्यक्रमासाठी धर्मप्रेमी श्री. मनोज कुमार शर्मा यांनी सहकार्य केले.
क्षणचित्रे
१. सनातन मंदिराचे पुजारी पंडित दधिच म्हणाले, ‘‘सनातनचे ग्रंथ समजण्यास इतके सोपे आहेत की, ते वाचल्यावर मीही आपल्यासारखा धर्मासाठी कार्य करू शकेन.’’
२. कार्यक्रम चालू होण्यापूर्वी पाऊस आला असतांनाही अनेक जण बैठकीला उपस्थित राहिले.
३. मंदिराचे विश्वस्त श्री. राधेश्याम माहेश्वरी यांनी सर्वांना वाचण्याच्या दृष्टीने मंदिरातील लहान वाचनालयासाठी सनातनचे लघु ग्रंथ घेतले.