ओवैसी यांचे ‘हिंदु राष्ट्र’विरोधी फुत्कार !
हिंदु राष्ट्राची संकल्पना जाणून न घेता अशी विधाने करून ओवैसी यांच्यासारखे हिंदुद्वेषी राजकारणी केवळ द्वेष पसरवण्याचेच कृत्य करत आहेत ! ज्यांना हिंदु राष्ट्र नको असेल, त्यांनी खुशाल पाकमध्ये जावे, असेच हिंदूंना वाटते !
नवी देहली : ‘भागवत हे हिंदु नाव देऊन आमचा इतिहास मिटवू शकत नाहीत. आमची संस्कृती, श्रद्धा, पंथ आणि व्यक्तीगत ओळख ही फक्त हिंदु धर्माशी संबंधित नाही आणि असणारही नाही. भारत कधीही हिंदु राष्ट्र नव्हते, नाही आणि असणारही नाही !’, असे ‘एम्आयएम्’चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ‘ट्वीट’द्वारे म्हटले आहे. रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘भारत हे हिंदु राष्ट्र आहे’, या वक्तव्यावर ओवैसी यांनी वरील प्रत्युत्तर दिले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात