Menu Close

हिंदुत्वनिष्ठांच्या नाहक अटकेच्या निषेधार्थ चेन्नई येथे शिवसेनेकडून आंदोलन

आंदोलनात सहभागी १ ‘तमिळनाडू शिवसेने’चे नेते श्री. राधाकृष्णन् आणि अन्य नेते

चेन्नई : ‘तमिळनाडू शिवसेने’चे नेते श्री. जी. राधाकृष्णन् यांच्या नेतृत्वाखाली येथील वळ्ळुवर कोट्टम येथे आंदोलन करण्यात आले. कुठलेही ठोस कारण नसतांना अटक करण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांची सरकारने तात्काळ सुटका करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. या वेळी हिंदी भाषेला प्राधान्य द्यावे, मंदिरांची लुटलेली मालमत्ता परत हिंदूंना मिळवून द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या, तसेच हिंदूंवर होणार्‍या आक्रमणाचा निषेधही करण्यात आला.

‘ऐन चतुर्थीच्या दिवसांमध्ये श्री. गोपाळकृष्णन् या शिवसैनिकावर आक्रमण करण्यात आले; मात्र अजूनही पोलिसांनी गुन्हेगाराला पकडलेले नाही. त्यामुळे पोलिसांनी ३० दिवसांत या आरोपीला अटक करावी’, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

हिंदु जनजागृती समितीचे श्री. जयकुमार यांनी या वेळी बोलतांना ईश्‍वरी राज्याचे महत्त्व विषद केले. ‘हिंदु एलेग्नार एझुची पेरावई’चे नेते श्री. पाझा संतोष यांनी त्यांचे अनुभव सांगतांना भगवा झेंडा हातात घेण्यात सार्थ अभिमान वाटत असल्याचे सांगितले.

या आंदोलनामध्ये ‘हिंदु अधिरादी पडई’चे श्री. राजा गुरु, मदुराई येथील श्री. सोलईकानन्, हिंदु महासभेचे मणिकंदन्, हिंदु मक्कल मुन्नानीचे श्री. व्ही.जी. नारायणन्, हिंदु जनजागृती समितीचे श्री. जयकुमार, सौ. सुगंधी जयकुमार आदी धर्माभिमानी सहभागी झाले.

क्षणचित्र

श्री. पाझा संथोष यांनी हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी प्रार्थना करून त्यांचे भाषण चालू केले. तंजावर येथे युवा शिबिर आयोजित करण्याविषयी त्यांनी सिद्धता दर्शवली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *