प्रकाश आंबेडकर यांची मुक्ताफळे !
मुडदे पाडण्याची भाषा करणे राज्यघटनेत बसते का ? प्रकाश आंबेडकरांची ही सहिष्णुता आहे का ?
नागपूर – समरसतेच्या नावाखाली संघाची फसवेगिरी चालू आहे. त्यांना देशात वेगळी व्यवस्था निर्माण करायची आहे. सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नावावर घटना पालटायची आहे. शासन आणि कायदा त्यांच्यासाठी दुय्यम गोष्ट आहे. त्यामुळेच आंदोलन करणार्यांना वेगवेगळी लेबले लावून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. असेच स्तोम देशात चालू ठेवून सत्ता चालवल्यास येणार्या काळात जनता त्यांचे मुडदे पाडल्याशिवाय रहाणार नाही, अशी मुक्ताफळे भारिप-बहुजन महासंघाचे नेते आणि माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी उधळली.
सरसंघचालकांनी समरसता आणि समानता यावर आमने-सामने यावे, असे थेट आव्हानही आंबेडकरांनी दिले. कस्तूरचंद पार्कवर ३ एप्रिल या दिवशी आयोजित जातिअंत परिषदेच्या निमित्ताने आंबेडकर बोलत होते. आंबेडकर पुढे म्हणाले की, मुळात संघाने बाबासाहेबांना कधी स्वीकारलेच नाही. त्यांचा विचार स्वीकारला असता, तर महिलांना मंदिराच्या गाभार्यात कधीच प्रवेश मिळाला असता.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात