Menu Close

शौर्यजागरण करणे, ही काळाची आवश्यकता ! – डॉ. मनोज सोलंकी, हिंदु जनजागृती समिती

डॉ. मनोज सोलंकी

मडगाव : महिषासुरमर्दिनी ही क्षात्रतेजाचे प्रगट रूप आहे आणि हे लक्षात घेऊन आपल्यामधील क्षात्रतेज जागृत करणे म्हणजेच शौर्यजागरण करणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी केले. फातोर्डा येथे दुर्गापूजा महोत्सवात आयोजित दसरा कार्यक्रमात ते बोलत होते.

१. डॉ. मनोज सोलंकी यांनी पुढे दसरा उत्सवाचा उद्देश स्पष्ट करतांना त्रेतायुगात श्रीरामाने रावणावर मिळवलेला विजय, द्वापरयुगात पांडवांनी केलेले शक्तीपूजन, शमीपूजनाचे महत्त्व, अपराजिता पूजन, सीमोल्लंघन आणि शस्त्रपूजन यांविषयी सविस्तर माहिती दिली.

२. डॉ. सोलंकी पुढे म्हणाले, ‘‘सध्या आयाबहिणींवर होणारे अत्याचार लक्षात घेऊन सर्व हिंदू भगिनींनी स्वरक्षण प्रशिक्षण घेणे काळाची आवश्यकता आहे. स्वरक्षण आणि राष्ट्र अन् धर्म यांचे रक्षण यांसाठी, तसेच मनुष्यातील शारीरिक आणि मानसिक  दुर्बलता घालवून त्याच्यातील सुप्त आध्यात्मिक शक्ती जागृत करणे आवश्यक आहे.’’

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *