Menu Close

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील हिंदुत्वनिष्ठ नेते कमलेश तिवारी यांची दिवसाढवळ्या हत्या !

कमलेश तिवारी यांच्या हत्येमागे इस्लामिक स्टेटचा हात असल्याचा संशय !

  • हिंदूबहुल भारतात हिंदूंच्या नेत्यांची दिवसाढवळ्या हत्या होते. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठांच्या सुरक्षेसाठी हिंदु राष्ट्र अत्यावश्यक !
  • भारतात मुसलमानांना जमावाने मारहाण केल्यावर टाहो फोडणारे पुरो(अधो)गामी, तथाकथित निधर्मीवादी आणि समाजवादी यांचा हिंदुत्वनिष्ठांची निर्घृण हत्या झाल्यावर आवाज का बसतो ?

लक्ष्मणपुरी : येथील हिंदु महासभेचे माजी नेते आणि हिंदुत्वनिष्ठ कमलेश तिवारी (वय ४५ वर्षे) यांची १८ ऑक्टोबरला दिवसाढवळ्या त्यांच्या कार्यालयात दोन अज्ञातांकडून गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. यानंतर आक्रमणकर्त्यांनी त्यांच्यावर गोळ्याही झाडल्या. या घटनेनंतर शहरात प्रचंड तणाव असून बाजारपेठा आणि दुकाने बंद करण्यात आली आहेत.

१. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिवारी यांचे येथील नाका परिसरातील खुर्शीदबाग येथे कार्यालय आहे. त्यांना भेटण्यासाठी २ व्यक्ती त्यांच्या कार्यालयात आल्या. दोघांकडेही मिठाईचे डबे होते आणि त्यात धारदार चाकू होते. या वेळी आक्रमणकर्त्यांनी तिवारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांचा गळा चिरून ते पसार झाले. तिवारी यांना तात्काळ रुग्णालयात भरती केल्यानंतर तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

२. तिवारी यांना हत्येपूर्वी एक दूरभाष आला होता; पण ‘तो नेमका कोणी केला होता ?’, ‘आक्रमण करणारे त्यांच्या परिचितांपैकी होते का ?’, याची चौकशी पोलिसांनी चालू केली आहे. वर्ष २०१५ मध्ये तिवारी यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठाने तिवारी यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत नोंदवण्यात आलेला गुन्हा मागे घेण्याचा आदेश दिला होता.

कमलेश तिवारी यांच्या हत्येमागे इस्लामिक स्टेट असल्याचा संशय !

वर्ष २०१७ मध्ये गुजरात आतंकवादविरोधी पथकाने अटक केलेल्या उबैद मिर्झा आणि कासीम यांच्या चौकशीत त्यांना त्यांच्या प्रमुखाने कमलेश तिवारी यांना जिवे मारण्यास सांगितले होते. या प्रमुखाने त्यांना कमलेश तिवारी यांचा व्हिडिओही दाखवला होता. ही माहिती या पथकाने त्यांच्याविरोधात प्रविष्ट केलेल्या आरोपपत्रही दिली आहे. या माहितीवरून कमलेश तिवारी यांची हत्या इस्लामिक स्टेटकडून करण्यात आल्याचे संशय व्यक्त करण्यात येत आहे. तिवारी यांची हत्या करण्याची पद्धत पाहूनही ही हत्या इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी केल्याचा संशय अधिक दाट होतो, असे म्हटले जात आहे.

सामाजिक संकेतस्थळांवरील काही प्रतिक्रिया

अधिवक्ता प्रशांत पटेल उमराव : कमलेश तिवारी यांच्याशी माझी जुनी ओळख होती. धर्मकार्यासाठी त्यांनी त्यांची पिढीजात जमीनही विकली होती. ते अलाहाबाद उच्च न्यायालयात राममंदिराच्या खटल्यात हिंदु पक्षकार म्हणून प्रकरण लढवत होते. राममंदिराच्या प्रकरणाचा निकाल येण्याआधी ही हत्या होणे, ही हिंदूंसाठी चेतावणी आहे. ही हत्या पहिली नव्हती आणि शेवटचीही नाही.

महेश विक्रम हेगडे : कोणीही येऊन हिंदु धर्म आणि देवता यांचे विडंबन करू शकतो. असे करतांना त्यांना जीव गमावण्याची भीती नसते; मात्र अन्य धर्मांविषयी बोलणार्‍या एका हिंदूची निर्घृण हत्या होते. असे असूनही हिंदू म्हणे ‘असहिष्णु’ आणि ‘धर्मांध’ !

हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांची शृंखला कधी थांबणार ?

ओडिशातील स्वामी लक्ष्मणानंद, केरळमध्ये साम्यवाद्यांच्या गुंडांनी ठार केलेले हिंदुत्वनिष्ठ नेते, तमिळनाडू आणि कर्नाटक येथे धर्मांधांनी केलेली हिंदुत्वनिष्ठांची हत्या, अशी हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांची सूची मोठी आहे. ही हत्यांची शृंखला थांबत नाही, हे संतापजनक आहे !

कमलेश तिवारी यांच्या हत्येमागे हिंदूंना असुरक्षित करण्याचे षड्यंत्र ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समिती कमलेश तिवारी यांच्या हत्येचा निषेध करते. त्यांच्या हत्येमुळे हिंदु समाजाची हानी झाली आहे. हिंदूंच्या नेत्यांच्या सातत्याने हत्या केल्या जात आहेत. हे हिंदु समाजाला असुरक्षित करण्याचे षड्यंत्र आहे. हिंदुत्वनिष्ठ योगी आदित्यनाथ सरकारने त्वरित मारेकर्‍यांना अटक करून हिंदूंना सुरक्षित जीवन जगण्यासाठी आश्‍वस्त करावे. तसेच तिवारी यांच्या सुरक्षेमध्ये हलगर्जीपणा करणार्‍या पोलिसांवर कारवाई करावी. यासह केंद्र सरकारने सर्व हिंदु संस्था, संघटना यांच्या नेत्यांना सुरक्षा पुरवावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.

इमामाने केली होती तिवारी यांच्या  शिरच्छेदासाठी ५१ लाख रुपयांची घोषणा

महंमद पैगंबर यांच्या कथित अवमानावरून बिजनौरच्या इमामाने कमलेश तिवारी यांचा शिरच्छेद करणार्‍यास ५१ लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. (धर्मांधांचे नेते हिंदु धर्म आणि परंपरा यांच्यावर अश्‍लाघ्य टीका करतात; मात्र हिंदूंनी त्यांच्याविषयी काही बोलल्यावर धर्मांध कायदा हातात घेऊन हिंदूंना ठार मारतात ! यावरून ‘असहिष्णु’ कोण आहे, हे स्पष्ट होते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्यानंतरही पोलिसांकडून तिवारी यांना सुरक्षा पुरवण्यात आली नव्हती. (धर्मांध नेत्यांना तात्काळ सुरक्षा पुरवणारे पोलीस हिंदु नेत्यांच्या सुरक्षेकडे कशा प्रकारे दुर्लक्ष करतात, याचे हे उदाहरण ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) तिवारी यांची हत्या करण्याची पद्धत पाहिल्यास इस्लामिक स्टेटप्रमाणे ही हत्या केल्याचे स्पष्ट होत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *