पनवेल येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून कमलेश तिवारी यांना श्रद्धांजली
पनवेल : उत्तरप्रदेशातील लक्ष्मणपुरी येथील हिंदुत्वनिष्ठ नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येमागे मोठे कारस्थान आहे. याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी येथील महाराणा प्रताप बटालियनचे संस्थापक श्री. अजयसिंह सेंगर यांनी १९ ऑक्टोबरला येथे केली. कमलेश तिवारी यांची १८ ऑक्टोबरला धर्मांधांनी गळा चिरून हत्या केली होती. या अनुषंगाने येथील पृथ्वी सभागृह येथे झालेल्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून तिवारी यांच्या हत्येचा निषेध करण्यात आला, तसेच हिंदुत्वनिष्ठांनी कमलेश तिवारी यांना श्रद्धाजंली वाहिली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या अमिता चौहान, कार्यकर्ते श्री. विजय बनसोड, हिंदु समाज पक्षाच्या सरिता पांडे, विहिंपच्या रेणु शुक्ला आदी उपस्थित होते.
श्री. अजयसिंह सेंगर पुढे म्हणाले की,
१. कमलेश तिवारी यांच्या जीविताला धोका असल्याने त्यांना उत्तरप्रदेश सरकारने संरक्षण देणे आवश्यक होते; मात्र त्यांना सुरक्षा मिळाली नाही. ‘सरकारने मला सुरक्षा न दिल्यामुळे मी झोपतांना बंदूक जवळ ठेवून झोपतो, तसेच माझ्या सुरक्षेविषयी पत्नीला ताण येत आहे’, असे कमलेश तिवारी यांनी मला भ्रमणभाष करून सांगितले होते. त्यानंतर कमलेश तिवारी यांना सुरक्षा देण्यात यावी, असे पत्र सिद्ध करून ते मी उत्तरप्रदेश येथील योगी आदित्यनाथ सरकारला ‘फॅक्स’ही केले होते.
२. देशातील हिंदू सुरक्षित नसून केरळ, उत्तरप्रेदश, कर्नाटक येथे हिंदु नेत्यांच्या सर्रास हत्या होणे ही दुर्दैवी गोष्ट आहे.
३. हिंदुत्वनिष्ठ नेत्यांची हत्या होत असल्याने हिंदूंनी जागे रहावे. उद्या तुमच्यावरही असे संकट येऊ शकते. कायदा हातात न घेता वैध मार्गाने लढा देऊन हिंदु धर्माच्या कार्याला वेळ द्या.
कमलेश तिवारी यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाची २ पोलीस ठाण्यांतील ३ पोलिसांनी माहिती घेतली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात