विंग : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विंग (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे १३ ऑक्टोबर या दिवशी युवती शौर्य जागरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वरक्षण प्रशिक्षणाची काही प्रात्यक्षिके दाखवली, तसेच उपस्थित युवतींना स्वरक्षणाच्या प्राथमिक कृतींचे प्रशिक्षण दिले.
हिंदु जनजागृती समितीच्या कु. क्रांती पेटकर यांनी ‘शौर्य जागरणाची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले. सध्याच्या असुरक्षित वातावरणाला सामोरे जाण्यासाठी प्रत्येक महिलेने स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन स्वतःसह राष्ट्र-धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध होणे आणि त्याला धर्माचरणाची जोड देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कु. क्रांती पेटकर यांनी केले.
या शिबिराला विंग आणि आसपासच्या गावांमधून १८ युवती उपस्थित होत्या.
विशेष – शिबिराच्या आयोजनात विंग येथे हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गात येणार्या महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
0 Comments